तांदूळ स्वच्छ धुवून 20-30 मिनिटांसाठी पाण्यात भिजत ठेवा. नंतर पाणी निथळून घ्या.
Picture Credit: Pinterest
एका जाड बुडाच्या भांड्यात दूध गरम करायला ठेवा आणि मंद आचेवर सतत ढवळत उकळा.
Picture Credit: Pinterest
दूध उकळल्यावर त्यात भिजवलेले तांदूळ घाला आणि मंद आचेवर शिजू द्या. तांदूळ मऊ होईपर्यंत ढवळत रहा.
Picture Credit: Pinterest
तांदूळ शिजल्यावर त्यात साखर घालून ढवळा. साखर विरघळेपर्यंत खीर मंद आचेवर ठेवा.
Picture Credit: Pinterest
एका पॅनमध्ये थोडे तूप गरम करून त्यात काजू, बदाम आणि मनुका थोडेसे भाजा आणि खिरीत घाला.
Picture Credit: Pinterest
अखेरीस खिरीत वेलदोडा पूड टाका आणि हलके ढवळून 2-3 मिनिटे शिजवा.
Picture Credit: Pinterest
तयार झालेली खीर गरम गरम किंवा फ्रिजमध्ये थंड करूनही सर्व्ह करू शकता.
Picture Credit: Pinterest