ओला नारळ किसून घ्या. केशर वापरणार असाल, तर ते थोड्या उकळत्या दूधात भिजत ठेवा.
Picture Credit: Pinterest
एका जाड बुडाच्या पातेल्यात साखर आणि दूध एकत्र करून मध्यम आचेवर गरम करत साखर पूर्ण विरघळवून घ्या.
Picture Credit: Pinterest
आता त्यात किसलेला नारळ घाला आणि मिश्रण सतत हलवत शिजवू द्या.
Picture Credit: Pinterest
मिश्रण आटायला लागले की त्यात तूप आणि भिजवलेले केशर घाला. सतत हलवत रहा.
Picture Credit: Pinterest
मिश्रण कढईला चिकटत नसेल आणि घट्टसर होऊ लागलं की त्यात वेलदोडा पूड घाला.
Picture Credit: Pinterest
तुपाने ग्रीस केलेल्या ताटात किंवा थाळीत हे मिश्रण ओता आणि सपाट पसरवा. वरून काजू-बदाम लावा.
Picture Credit: Pinterest
थोडं थंड झाल्यावर सुरीने चौकोनी किंवा डायमंड आकारात वड्या कापा. पूर्ण थंड झाल्यावर डब्यात साठवा.
Picture Credit: Pinterest