Published July 24, 2024
By Dipali Naphade
पाणी शरीर निरोगी राखण्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वाचा घटक आहे. पाणी न पिण्याने डिहायड्रेशन वाढते, कसे प्यावे पाणी? (Image Credit: iStock)
आयुर्वेदिक पद्धतीनुसार पाणी पिण्याने शरीराच्या अनेक समस्या दूर होतील असे आयुर्वेदिक डॉ. दीपक कुमार यांनी सांगितले आहे
कधीही उभं राहून पाणी पिऊ नये. बसून पाणी पिण्याने शरीर पाणी व्यवस्थित शोषून घेते
साधे वा कोमट पाणी नेहमी प्यावे. फ्रिजमधील पाणी हे पचनाला बाधक असून जाडी वाढू शकते
सकाळी उपाशीपोटी नेहमी 1 ग्लास पाणी पिण्याने शरीर निरोगी आणि फिट राहण्यास मदत मिळते
सकाळी उपाशापोटी पाणी पिण्याने मेटाबॉलिज्म वाढण्यास मदत मिळते
पचनसंस्था चांगली राहण्यासाठी पाणी नेहमी उकळूनच प्यावे. यामुळे अनेक आजार दूर राहण्यास मदत मिळते
सकाळी उठून 1 ग्लास, दुपारी जेवणाआधी दीड तास पहिले, रात्री जेवल्यानंतर 1 तासाने पाणी प्यायलाच हवे
हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही