Published Dece 17, 2024
By Sayali Sasane
Pic Credit- Instagram
रितेश देशमुखने ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आणि अभिनेत्याने चाहत्यांचे मन जिंकले.
रितेश देशमुखचा 'अपना सपना मनी मनी' हा चित्रपट देखील खूप मजेदार आहे. प्रेक्षकांचं खूप मनोरंजन करणारा आहे.
रितेश देशमुख, अक्षय कुमार आणि फरदीन खान यांचा हा 'है बेबी' चित्रपट प्रेक्षकांचं खूप मनोरंजन करणारा आहे. या चित्रपटानंतर अभिनेत्याला खूप प्रसिद्धी मिळाली.
'धमाल' या चित्रपटातून अभिनेत्याने चाहत्यांची मने जिंकली. रितेशचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडू लागला.
'हाउसफुल' या कॉमेडी चित्रपटातून रितेशने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. यानंतर त्याचे अनेक चित्रपट सुपरहिट झाले.
कॉमेडी पात्र साकारल्या नंतर रितेशने 'एक विलेन' या चित्रपटातून खलनायकाची भूमिका साकारली जी प्रेक्षकांना खूप आवडली.
'लई भारी' या चित्रपटातून रितेश देशमुखने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. हा चित्रपट आणि यातील गाणी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली.
.
'वेड' या मराठी चित्रपटाद्वारे अभिनेत्याने दिग्दर्शनात पदार्पण केले. आणि आता रितेश देशमुखचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
.