कार की रॉकेट? Tesla Roadster चं भन्नाट तंत्रज्ञान पाहून थक्क व्हाल!

Automobile

16 Oct 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

वेगवान इलेक्ट्रिक कार तुम्ही पाहिली असेल; पण हवेत झेप घेणारी कार? Tesla Roadster च्या नव्या मॉडेलने अशाच भन्नाट तंत्रज्ञानामुळे लक्ष वेधलं आहे.

कार की रॉकेट?

Picture Credit:tesla

या कारमध्ये विशेष थ्रस्टर्समधून उच्च दाबाची संकुचित हवा बाहेर सोडली जाते. या हवेच्या जोरामुळे कारला अतिरिक्त धक्का मिळतो.

रॉकेटसारखा थ्रस्ट कसा मिळतो?

Picture Credit:tesla

या थ्रस्टर यंत्रणेत साठवलेली संकुचित हवा वापरली जाते. पारंपरिक रॉकेट इंजिनप्रमाणे इंधन जाळून थ्रस्ट निर्माण करण्याची ही पद्धत नाही.

पेट्रोल किंवा रॉकेट इंधनाची गरज नाही?

Picture Credit:tesla

कारच्या खालच्या बाजूला असलेली सक्शन फॅन सिस्टीम हवा खेचून अतिरिक्त डाउनफोर्स निर्माण करते. त्यामुळे वेगात वळण घेताना अधिक पकड मिळवण्यास मदत होऊ शकते.

कार रस्त्याला चिकटून राहणार!

Picture Credit:tesla

Rocket पॅकेजमध्ये दहा थ्रस्टर्सची व्यवस्था असल्याचं सांगण्यात आलं आहे. यामुळे कारला काही काळ हवेत उचलणं आणि हवेत हालचाली करणं शक्य असल्याचं प्रदर्शनात दाखवलं.

हवेत झेप आणि फिरण्याची क्षमता

Picture Credit:tesla

नव्या Roadster मध्ये Steer-by-Wire यंत्रणा आहे. यात स्टिअरिंगची हालचाल इलेक्ट्रॉनिक सिग्नलद्वारे चाकांपर्यंत पोहोचते. ब्रेक आणि अॅक्सिलरेटर नियंत्रणातही इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान वापरलं आहे.

स्टिअरिंगमध्येही हायटेक बदल

Picture Credit:tesla

Tesla ने Thrust पॅकेजसाठी 0 ते 60 mph म्हणजेच सुमारे 96.6 किमी/तास वेग एका सेकंदापेक्षा कमी वेळात गाठण्याचा दावा केला आहे. हा कंपनीचा दावा आहे; स्वतंत्र चाचणीचे निष्कर्ष उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे.

एका सेकंदापेक्षाही कमी वेळात 0-96 किमीचा वेग?

Picture Credit:tesla

Performance मध्ये सक्शन फॅन, Thrust मध्ये मागील बाजूस अतिरिक्त थ्रस्टर्स, तर Rocket मध्ये हवेत झेप घेण्यासाठी अधिक थ्रस्टर्सची व्यवस्था आहे. Rocket व्हर्जनमध्ये फक्त एक सीट असेल.

तीन व्हर्जन्स, वेगवेगळे तंत्रज्ञान

Picture Credit:tesla

Tesla ने उत्पादन २०२८ मध्ये सुरू करण्याचं लक्ष्य सांगितलं आहे. मात्र, भारतातील उपलब्धता, अंतिम किंमत आणि सार्वजनिक रस्त्यांवर थ्रस्टर असलेल्या व्हर्जनच्या वापराची कायदेशीर स्थिती स्पष्ट होणं बाकी आहे.

भारतात कधी येणार?

Picture Credit:tesla