आयुर्वेद सांगतं की, प्रत्येक ऋतुनुसार आहारात बदल करावा.
Picture Credit: Pinterest
यामुळे उन्हाळ्यात भात खावा की चपाती हे जाणून घेऊयात.
खरं तर दोन्हीही पदार्थ शरीरासाठी चांगले असू शकतात.
तरीही हवामान आणि शरीराच्या गरजेनुसार योग्य प्रमाणात खाणं महत्त्वाचं आहे.
भात पचायला हलका असतो. त्यामुळे उन्हाळ्यात पोटावर ताण येत नाही.
भातामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्याने शरीर थंड ठेवण्यास मदत होते.
ज्यांना उष्णतेमुळे भूक कमी लागते, त्यांच्यासाठी भात सहज पचतो.
ज्यांना वजन नियंत्रणात ठेवायचे आहे, त्यांच्यासाठी चपाती चांगला पर्याय ठरू शकतो.
चपातीमध्ये फायबर जास्त असते, त्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते.
उन्हाळ्यात दुपारी भात खाल्ल्यास पचन सोपे होते.
रात्री चपाती खाल्ल्यास पोट जड होत नाही.
भातासोबत दही, ताक, भाजी आणि सलाड घेतल्यास शरीर थंड राहते.