Royal Enfield च्या Mana Black Edition च्या नव्या ब्लॅक एडिशनची मलेशियात एँट्री!

Automobile

20 July 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

आकर्षक थीम

Royal Enfield ने Himalayan 450 चे Mana Black Edition मलेशियामध्ये सादर केले. यामध्ये पूर्णपणे काळ्या रंगाची आकर्षक थीम देण्यात आली आहे.

Picture Credit: Pinterest

ग्रे रंगातील खास ग्राफिक्स 

या बाईकच्या फ्युएल टँकवर गडद ग्रे रंगातील खास ग्राफिक्स देण्यात आले आहेत. त्यामुळे तिचा प्रीमियम आणि अॅडव्हेंचर लूक अधिक उठून दिसतो.

Picture Credit: Pinterest

पंक्चरचा धोका कमी

Mana Black Edition मध्ये ट्यूबलेस स्पोक व्हील्स दिले आहेत. त्यामुळे ऑफ-रोड राइडिंगदरम्यान पंक्चरचा धोका कमी होण्यास मदत होते.

Picture Credit: Pinterest

अॅडव्हेंचर बदल

बाईकमध्ये हँडगार्ड्स, उंच सीट, वाढलेला ग्राउंड क्लीयरन्स आणि छोटा रिअर मडगार्ड यांसारखे अॅडव्हेंचर-केंद्रित बदल करण्यात आले आहेत.

Picture Credit: Pinterest

इंजिन

इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यात 452cc, लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन असून ते सुमारे 40 PS पॉवर निर्माण करते.

Picture Credit: Pinterest

लांब पल्ल्याच्या टूरिंगसाठी उपयुक्त

6-स्पीड गिअरबॉक्स, आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स आणि लांब पल्ल्याच्या टूरिंगसाठी उपयुक्त फीचर्समुळे Himalayan 450 आधीच अॅडव्हेंचर रायडर्समध्ये लोकप्रिय आहे.

Picture Credit: Pinterest

Mana Black Edition

सध्या Mana Black Edition मलेशियन बाजारासाठी सादर करण्यात आले. भारतात हे एडिशन कधी येणार याबाबत कंपनीने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.

Picture Credit: Pinterest

दमदार ब्लॅक थीम

दमदार ब्लॅक थीम, अॅडव्हेंचर-केंद्रित अपडेट्स आणि Royal Enfield ची विश्वासार्हता यामुळे Himalayan Mana Black Edition अनेक रायडर्सच्या पसंतीस उतरण्याची शक्यता आहे.

Picture Credit: Pinterest