Royal Enfieldचा जलवा! ऑगस्टमध्ये विकल्या 1.26 लाखांहून अधिक बाईक्स

Automobile

01 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

भारतात ऑगस्टमध्ये 1,14,204 Royal Enfield बाइक्सची विक्री झाली. ऑगस्ट 2025 मध्ये हा आकडा 1,02,876 होता.

देशांतर्गत विक्रीही मजबूत

Picture Credit: pinterest

देशाबाहेरील बाजारातही Royal Enfieldची कामगिरी चांगली राहिली. ऑगस्टमध्ये कंपनीने 12,275 मोटरसायकली Export केल्या, जी मागील वर्षाच्या तुलनेत 10% वाढ आहे.

Exportमध्येही वाढ

Picture Credit: pinterest

एप्रिल ते ऑगस्ट 2026 या कालावधीत भारतात Royal Enfieldने 5,20,695 बाइक्स विकल्या. गेल्या वर्षी याच कालावधीत 4,07,909 युनिट्सची विक्री झाली होती.

5 महिन्यांत 5.20 लाखांहून अधिक बाईक्स!

Picture Credit: pinterest

एप्रिल-ऑगस्ट 2026 मध्ये देशांतर्गत आणि Export मिळून कंपनीची एकूण विक्री 5,75,138 मोटरसायकलींवर पोहोचली. यामध्ये वर्ष-दर-वर्ष 23% वाढ झाली.

एकूण विक्री 5.75 लाखांवर

Picture Credit: pinterest

ऑगस्टमध्ये कंपनीने Classic 350 Gorkha Edition सादर केली. Gorkha Green रंग आणि खास Khukri-inspired insignia या बाइकच्या आकर्षणात भर घालतात.

Classic 350 Gorkha Editionची एँट्री

Picture Credit: pinterest

Continental GT 650 ला नवीन अपडेट मिळाले आहे. यात LED टर्न इंडिकेटर्स, ब्लॅक इन्स्ट्रुमेंट काउल आणि USB Type-C फास्ट चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे.

Continental GT 650मध्येही अपडेट

Picture Credit: pinterest

कंपनीच्या आगामी EV प्लॅनलाही वेग आला आहे. Flying Flea C6 ने बंगळुरूमध्ये ग्राहकांच्या वापरातून 50,000 किमीहून अधिक अंतर पूर्ण केल्याची माहिती Royal Enfieldने दिली आहे.

Royal Enfieldची Electric तयारी!

Picture Credit: pinterest

ऑगस्टमधील वाढती विक्री पाहता Royal Enfieldने आगामी सणासुदीच्या काळात मजबूत स्थितीत प्रवेश केला आहे. नवीन Edition आणि अपडेटेड मॉडेल्समुळे ग्राहकांचे लक्ष आणखी वेधले जाण्याची शक्यता आहे.

Festive Seasonपूर्वी मजबूत सुरुवात

Picture Credit: pinterest

Royal Enfieldच्या पोर्टफोलिओमध्ये पेट्रोल मोटरसायकलींसोबत Electric Bikesचाही विस्तार होणार आहे. त्यामुळे आगामी काळात कंपनीकडून आणखी नवीन मॉडेल्स आणि अपडेट्स पाहायला मिळू शकतात.

आता पुढे काय?

Picture Credit: pinterest