जवळपास समान बजेटमध्ये छोटी पण फीचर-लोडेड SUV घ्यायची की मोठी 7-सीटर SUV?
Picture Credit:pinterest
Tata Nexon Fearless Plus (PS) ची मुंबई ऑन-रोड किंमत सुमारे ₹17 लाख, तर Mahindra XUV 7XO AX सुमारे ₹16.78 लाख आहे. म्हणजे फरक अवघा ₹22,000!
Picture Credit:pinterest
XUV 7XO ही Nexonपेक्षा मोठी SUV असून 7-सीटर कॉन्फिगरेशनचा पर्याय देते. मोठ्या कुटुंबासाठी किंवा जास्त स्पेस हवी असल्यास याचा फायदा होतो.
Picture Credit:pinterest
Nexonच्या टॉप व्हेरिएंटमध्ये 360° कॅमेरा, ADAS, पॅनोरॅमिक सनरूफ, वायरलेस चार्जिंग आणि ऑटो AC यांसारखी फीचर्स मिळतात.
Picture Credit:pinterest
व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स आणि JBL साउंड सिस्टिमसारखी उपकरणे Nexonला अधिक फीचर-रिच बनवतात. म्हणजे प्रीमियम फीचर्स हव्या असतील तर Nexon आकर्षक पर्याय ठरतो.
Picture Credit:pinterest
XUV 7XOच्या बेस AX व्हेरिएंटमध्ये 12.3-इंच इन्फोटेनमेंट स्क्रीन + 12.3-इंच पॅसेंजर स्क्रीनसह ट्रिपल-स्क्रीन सेटअप मिळतो. ड्रायव्हर डिस्प्लेही 12.3-इंचचा आहे.
Picture Credit:pinterest
या तुलनेत Nexonमध्ये 1.5-लिटर डिझेल इंजिन असून ते 114 bhp आणि 260 Nm देते. XUV 7XOच्या पेट्रोल व्हेरिएंटमध्ये 2.0-लिटर टर्बो पेट्रोल असून 200 bhp आणि 380 Nm आउटपुट मिळते.
Picture Credit:pinterest
Nexonला 6-स्पीड AMT मिळते, तर तुलनेसाठी घेतलेल्या XUV 7XO AX पेट्रोलला 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे. त्यामुळे शहरातील सोयीसाठी Nexon, तर दमदार परफॉर्मन्ससाठी XUV 7XO आकर्षक ठरू शकते.
Picture Credit:pinterest
XUV 7XOमध्ये बेस व्हेरिएंटपासून DAVINCI सस्पेंशन सेटअप देण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या SUVच्या आरामदायी राइडचा फायदा मिळण्याची शक्यता आहे.
Picture Credit:pinterest
फुली-लोडेड 5-सीटर हवी असेल → Tata Nexon मोठी 7-सीटर, जास्त Power आणि Premium SUV Feel हवी असेल → Mahindra XUV 7XO तुमच्यासाठी प्राधान्य Features की Size & Performance, यावर अंतिम निर्णय ठरेल.