रॉयल एनफील्डच्या पहिल्या इलेक्ट्रिक बाईक Flying Flea C6 ला आता 'पॅराशूट व्हाईट' (Parachute White) हा एक नवीन आणि आकर्षक रंग मिळाला आहे.
Picture Credit: flyingflea
या नवीन व्हेरियंटमध्ये वॉर्म व्हाईट (Warm White) बॉडीवर्कसोबत कॉन्ट्रास्टिंग ब्लॅक सेक्शन्स आणि सिग्नेचर ब्लू ॲक्सेंट देण्यात आले आहेत, जे या बाईकला खूपच प्रीमियम लूक देतात.
Picture Credit: flyingflea
आता भारतीय बाजारात ही बाईक पॅराशूट व्हाईट, फ्लाय ग्रीन (Flea Green) आणि स्टॉर्म ब्लॅक (Storm Black) अशा एकूण ३ रंगांमध्ये उपलब्ध असेल.
Picture Credit: flyingflea
या इलेक्ट्रिक बाईकमध्ये ३.९१ kWh ची लिथियम-आयन बॅटरी आहे. कंपनीचा दावा आहे की, ही बाईक एका चार्जमध्ये १५४ किमी (IDC range) पर्यंत धावू शकते.
Picture Credit: flyingflea
Flying Flea C6 चा टॉप स्पीड ११५ किमी प्रतितास आहे. ही एक वजनाने हलकी बाईक असून तिचे एकूण वजन फक्त १२४ किलो आहे, ज्यामुळे ती चालवण्यास सोपी बनते.
Picture Credit: flyingflea
यात ३.५-इंचाचा कलर TFT टचस्क्रीन डिस्प्ले आहे, जो Fleaware OS वर चालतो. यामध्ये नेव्हिगेशन, क्रूझ कंट्रोल आणि ५ राइड मोड्स मिळतात.
Picture Credit: flyingflea
या बाईकच्या चार्जिंगसाठी वेगळा चार्जिंग ब्रिक सोबत नेण्याची गरज नाही. ही बाईक अवघ्या ६५ मिनिटांत २० ते ८० टक्क्यांपर्यंत चार्ज होते.
Picture Credit: flyingflea
सध्याच्या इतर रंगांमधील मॉडेल्सची किंमत २.७९ लाख रुपये (एक्स-शोरूम, बेंगळुरू) आहे. पॅराशूट व्हाईट रंगाची स्वतंत्र किंमत अद्याप जाहीर झालेली नाही.
Picture Credit: flyingflea