Published Nov 22, 2024
By Sayali Sasane
Pic Credit - Instagram
'तुझ्या सुंदरतेची किमया न्यारी...' सईच्या नव्या फोटोवर टाका नजर!
मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या तिच्या अग्नी चित्रपटाच्या प्रोमोशन मध्ये व्यस्त आहे.
सईने या चित्रपटाच्या प्रोमोशन दरम्यान नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सईने या शेअर केलेल्या फोटोमध्ये सुंदर गुलाबी साडी परिधान केली आहे. गुलाबी साडीवर अप्रतिम नक्षीकाम देखील केले आहे.
.
या साडीवर सईने वेगवेगळ्या अंदाजात पोज देऊन आकर्षित फोटोशूट देखील केले आहे. या फोटोमध्ये ती खूप सुंदर आणि मोहक दिसत आहे.
.
सईने या साडीवर ऑफ शोल्डर ब्लाउसची निवड केली आहे. ज्यामुळे ही साडी आणखी खुलून दिसत आहे.
सईने या गुलाबी साडीवर फक्त कानात प्लसचे एअररिंग घातले आहे. ज्यामुळे तिच्या चेहऱ्यावरील सौंदर्य आणखी आकर्षित दिसून येत आहे.
सईने या साडीवर खूप साधा आणि मोहक मेकअपची निवड केली आहे, ज्यामध्ये आयलायनर, लिपस्टिक आणि ब्लुशचा वापर आहे.
सईने या साडीवर तिचे लांबलचक सुंदर आणि सिल्की केस मोकळे ठेवले असून, ती अगदी अप्सरा सारखी दिसत आहे.