Galaxy Z Fold8 Ultra ते Flip8: नवीन सीरिजमध्ये काय मिळणार?

Science Technology

22 July 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Samsung ने Galaxy Z Fold8 Ultra, Galaxy Z Fold8 आणि Galaxy Z Flip8 सादर करत फोल्डेबल स्मार्टफोन मालिकेत तीन वेगवेगळे पर्याय उपलब्ध केले आहेत.

Galaxy Z Fold8 Series लॉन्च

Picture Credit: Samsung

मोठा डिस्प्ले, मल्टीटास्किंगसाठी अधिक जागा आणि AI-आधारित प्रोडक्टिव्हिटी टूल्समुळे Fold8 Ultra प्रीमियम वापरकर्त्यांना लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे.

Galaxy Z Fold8 Ultra

Picture Credit: Samsung

Fold8 मध्ये अधिक कॉम्पॅक्ट डिझाइन, हलकी बॉडी आणि मोठा फोल्डेबल डिस्प्ले देण्यात आला आहे. काम, मनोरंजन आणि दैनंदिन वापरासाठी तो अधिक सोयीस्कर बनवण्यात आला आहे.

Galaxy Z Fold8

Picture Credit: Samsung

Galaxy Z Flip8 अधिक स्लिम डिझाइन, सुधारित FlexWindow आणि AI फीचर्ससह सादर करण्यात आला आहे. स्टाइल आणि पोर्टेबिलिटीला प्राधान्य देणाऱ्यांसाठी हा पर्याय आहे.

Galaxy Z Flip8

Picture Credit: Samsung

नवीन फोल्डेबल्समध्ये Galaxy AI आणि Gemini AI च्या मदतीने लेखन, भाषांतर, शोध, फोटो एडिटिंग आणि दैनंदिन कामे अधिक स्मार्ट पद्धतीने करता येतात.

Galaxy AI फीचर्स

Picture Credit: Samsung

नवीन हिंज, सुधारित फोल्डेबल स्ट्रक्चर आणि टिकाऊ बांधणीमुळे या सीरिजमध्ये मजबुती आणि वापराचा अनुभव अधिक सुधारण्यात आला आहे.

अधिक मजबूत डिझाइन

Picture Credit: Samsung

Fold8 Ultra – प्रोफेशनल आणि पॉवर युजर्स Fold8 – मल्टीटास्किंग आणि मनोरंजनासाठी Flip8 – स्टाइल, कॉम्पॅक्ट डिझाइन आणि दैनंदिन वापरासाठी

कोणासाठी कोणता फोन?

Picture Credit: Samsung

Samsung ने या तिन्ही फोल्डेबल्सचे जागतिक अनावरण केले असून, निवडक बाजारांमध्ये प्री-ऑर्डर सुरू झाले आहेत. देशानुसार उपलब्धतेत बदल असू शकतो.

उपलब्धता

Picture Credit: Samsung

Galaxy Z Fold8 Ultra, Fold8 आणि Flip8 यांच्या माध्यमातून Samsung ने प्रीमियम डिझाइन, AI आणि प्रगत फोल्डेबल तंत्रज्ञान यांचा संगम सादर केला आहे. वेगवेगळ्या गरजांसाठी तीन स्वतंत्र पर्याय देणे ही या सीरिजची सर्वात मोठी जमेची बाजू आहे.

फोल्डेबल स्मार्टफोनची नवी दिशा

Picture Credit: Samsung