Written By: Prajakta Pradhan
Source: pinterest
सनातन धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. धनप्राप्तीसाठी या दिवशी गणपतीला काय अर्पण करावे ते जाणून घेऊया
पंचांगानुसार, 16 मे रोजी संकष्टी चतुर्थी आहे. या दिवशी योग्य विधींनी पूजा करणे फायदेशीर आहे.
संकष्टी चतुर्थीची सुरुवात 16 मे रोजी सकाळी 4.2 वाजता होईल आणि त्याची समाप्ती 17 मे रोजी सकाळी 5.13 वाजता होईल
या दिवशी गणपतीची पूजा करताना अशा काही गोष्टी अर्पण केल्यास पैशाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होईल.
संकष्टी चतुर्थीला पूजा करताना गणपतीला बुंदीच्या लाडूचा प्रसाद अर्पण करा.
गणपतीला दुर्वा खूप आवडतात. संकष्टी चतुर्थीला दुर्वा अर्पण करणे शुभ मानले जाते. गणपतीला 21 दुर्वा अर्पण केल्यास सुख समृद्धी नांदते.
संकष्टी चतुर्थीला पूजा करतेवेळी मोदकाचा नैवेद्य दाखवावा. यामुळे व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात
आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या लोकांनी संकष्टी चतुर्थीला या वस्तू अर्पण कराव्यात, यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल