शरीर डिहायड्रेट झाल्यास कोणती लक्षणं दिसू येतात

Written By: Mayur Navle 

Source: Pexels

हल्ली उन्हाळ्याच्या दिवसात अनेकदा आपण डिहायड्रेट होतो. अशावेळी कोणते लक्षणं शरीरात दिसतात याबद्दल जाणून घेऊयात.

उन्हाळा

शरीरातील पाण्याची कमतरता असल्यास तोंड सतत कोरडं पडते.

तोंड व घसा कोरडा पडणे

सामान्यतः लघवी फिकट पिवळसर असते, पण डिहायड्रेशनमुळे ती गडद पिवळी होऊ शकते.

लघवीचा रंग गडद होणे

लघवी होण्याचं प्रमाण खूपच कमी होतं किंवा अनेक तास लघवी होत नाही.

लघवीचे प्रमाण  कमी होणे

शरीरात पाण्याची कमतरता असल्यामुळे ऊर्जा कमी होते आणि अधिक थकवा जाणवतो.

थकवा व अशक्तपणा जाणवणे

डिहायड्रेशनमुळे रक्तदाब कमी होऊन चक्कर येण्याची शक्यता असते.

चक्कर येणे 

जर तुम्ही सतत डिहायड्रेट होत असाल तर मग डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

डॉक्टरांचा सल्ला