Published Mar 16, 2025
By Prajakta Pradhan
Pic Credit - pinterest
सनातन धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी गणपतीची पूजा केल्याने लाभ होते. संकष्टी चतुर्थीला कोणत्या गोष्टींचा नैवेद्य दाखवावा जाणून घ्या
पंचांगानुसार, सोमवार 17 मार्चला भालचंद्र संकष्टी चतुर्थी साजरी केली जाणार आहे. या दिवशी गणेशाची आराधना केल्याने धन-समृद्धी प्राप्त होते.
संकष्टी चतुर्थी तिथीची सुरुवात 17 मार्चला संध्याकाळी 7.33 वाजता होईल आणि त्याची समाप्ती 18 मार्चला रात्री 10.9 वाजता होईल
संकष्टी चतुर्थीची पूजा करताना गणपतीला नैवेद्य दाखवणे शुभ मानले जाते. यामुळे माणसाच्या आयुष्यात कशाचीही कमतरता नसते.
संकष्टी चतुर्थीची पूजा करताना गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवावा. यामुळे साधकाच्या जीवनात सुख-समृद्धी येते.
गणपतीला बेसनाचे लाडू खूप आवडतात. संकष्टी चतुर्थीला बेसन लाडूचा नैवेद्य दाखवावा. यामुळे कुटुंबात शांतता टिकून राहते
संकष्टी चतुर्थीला नारळ, फळ, फूल, दूध आणि दही या गोष्टींचा नैवेद्य दाखवावा. यामुळे गणेश प्रसन्न होतो आणि जीवनातील अडथळे दूर होतात.
या वस्तू गणेशाला अर्पण केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते. त्यामुळे प्रगतीची शक्यता निर्माण होते.