www.navarashtra.com

Published Sept 10, 2024

By Shubhangi Mere

Pic Credit - Social Media

भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिलने बांगलादेशविरुद्ध चेन्नई येथे सुरू असलेल्या कसोटीत शतक झळकावले आहे, त्याने केलेल्या कसोटीमधील कामगिरीवर एकदा नजर टाका.

भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये पहिल्या कसोटी सामान्यांच्या दुसऱ्या इनिंगमध्ये गिलने १७६ चेंडूंत ११९ धावा केल्या. 

शतक

चेपॉकमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना भारताकडून एक राहुल द्रविड आणि आता दुसरा शुभमन गिलने शतके झळकावली आहेत. 

विक्रम

कसोटीमध्ये दुसऱ्या डावात फलंदाजी करताना त्याचे शेवटचे चार डाव १०४, ९१, ५२* आणि ११९* धावांचे आहेत.

शेवटचे चार डाव

कसोटीच्या पहिल्या डावात शून्य धावा केल्यानंतर कसोटीच्या दुसऱ्या डावात शतक झळकावणाऱ्याच्या यादीमध्ये गिल सामील झाला आहे. 

हिट/फ्लॉप 

भारत विरुद्ध बांग्लादेश सामन्यामध्ये शुभमन गिलने त्याच्या करियरचे कसोटीतील पाचवे शतक झळकावले.

पाचवे शतक

शुभमनने आतापर्यंत 26 कसोटी सामन्यांच्या 48 डावांमध्ये 1611 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याची सर्वोच्च धावसंख्या १२८ धावांची आहे.

कसोटीची कामगिरी

शुभमन गिल आणि रिषभ पंत या जोडीने भारत विरुद्ध बांग्लादेश सामन्यात १६७ धावांची खेळी खेळली. 

गिल-पंत

शुभमन व्यतिरिक्त ऋषभ पंतने 128 चेंडूत 13 चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 109 धावांची खेळी केली.

रिषभ पंत

पंतच्या कसोटी कारकिर्दीतील हे सहावे शतक होते आणि धोनीसोबतच तो सर्वाधिक शतके झळकावणारा भारतीय यष्टीरक्षक फलंदाज बनला आहे.

धोनीचा विक्रम