एका ठराविक वयानंतर आई आणि मुलीमध्ये मैत्रिणीचं नातं तयार होतं.
Img Source: Pintrest
वयात आल्यावर अनेक मानसिक आणि शारिरीक बदलांना तोंड द्यावे लागते.
याचमुळे आईने मुलीची मैत्रीण होऊन काही गोष्टी सांगितल्या पाहिजेत.
तू जशी आहेस, तशीच सुंदर आहेस. तुझ्या आयुष्यासाठी तुझं असणं महत्वाचं आहे.
नाही म्हणणं शिकणं हे ताकद आहे.स्वतःची तत्व महत्त्वाची आहेत.
आयुष्यात अपयश आलं तरी तू हरायचं नाही.अपयश हे यशाकडे नेणारा टप्पा असतो.
आपली मतं ठामपणे मांडायला शिक. कुणीही तुझं मत दडपून टाकू नये, याची काळजी ठेव.
स्वतःवर विश्वास ठेव.तुझ्या प्रत्येक निर्णयामागे तुझा आत्मविश्वास असू दे.
शिकणं कधीच थांबवू नकोस. ज्ञान ही तुझी खरी संपत्ती आहे.
कोणावरही अवलंबून राहू नकोस. आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या स्वावलंबी हो.
स्वत:चा आदर करायला शिक. अन्यायाविरुद्ध आवाज उठव.