Published Dec 12 , 2024
By Shweta Chavan
Pic Credit - iStock
पवारांचा राजकीय काळ हा महाराष्ट्राचा मुख्य समकालीन राजकीय इतिहास आहे. त्यामुळे या काळातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा परामर्श घेणं आवश्यक आहे.
जुलै 1978 मध्ये 'पुरोगामी लोकशाही दल' सरकार स्थापन. 38व्या वर्षी शरद पवार महाराष्ट्राचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री बनले.
1988 मध्ये राजीव गांधी यांनी शंकरराव चव्हाण यांना त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात घेतलं आणि शरद पवार दुसऱ्यांदा मुख्यमंत्री..
मुंबईत धार्मिक दंगली सुरू झाल्या आणि त्यावेळी मार्च 1993 मध्ये परत मुख्यमंत्री म्हणून पवारांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
शरद पवार तेव्हा काँग्रेसमध्ये असते तर त्यांना पंतप्रधानपदाची संधी होती. पवार नव्या सरकारमध्ये सहभागी झाले आणि पुढची 10 वर्षं कृषिमंत्री राहिले.
2019 च्या या महाराष्ट्रातल्या राजकीय नाट्यानं पवारांच्या निवडणुकीतल्या कौशल्यांबरोबरच राजकीय डावपेचही पाहिले.
.
2016 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं लोढा समितीच्या शिफारशी स्वीकारल्यानंतर पवारांची स्वत:ची क्रिकेट व्यवस्थापनातली इनिंग संपुष्टात आली.
.
14 जानेवारी 1994 मध्ये पवार तिसऱ्यांदा मुख्यमंत्री असताना अंतिम नामविस्तार झाला. मराठवाड्यातील राजकीय समीकरणं मात्र बदलली.
.
2008 च्या कर्जमाफीचा राजकीय फायदाही झाला आणि 2009 मध्ये पुन्हा एकदा 'यूपीए'चं सरकार आलं.
.
6 फेब्रुवारी 2024 रोजी याप्रकरणी निकाल देत निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिलं.
.