www.navarashtra.com

Published  Oct 14, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - Pinterest/iStock

कोजागिरीला चंद्रप्रकाशात मसाला दूध का पितात?

धार्मिक मान्यतेनुसार कोजागिरी पौर्णिमेला खूप महत्त्व आहे. चंद्राच्या प्रकाशात यादिवशी मसालादूध वा खीर बनवून नंतर त्याचे सेवन केले जाते

कोजागिरी

हिंदू पंचांगानुसार, दरवर्षी शुक्लपक्षाच्या चतुर्दशी तिथी रोजी कोजागिरी पौर्णिमा असून यावर्षी 16 ऑक्टोबर रोजी साजरी करण्यात येणार आहे

कधी आहे?

शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा सोळा कलांनी परिपूर्ण असतो. या दिवशी देव नभातून अमृताचा वर्षाव करतो असे मानले जाते

महत्त्व

.

चंद्रप्रकाशात खीर वा मसाला दूध ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते आणि त्यानंतर त्याचे सेवन केल्याचे फायदे आहेत सांगण्यात येते

चंद्रप्रकाश

.

चंद्रप्रकाशात ठेवलेल्या दुधामधील अथवा खीरमधील बॅक्टेरिया नष्ट होतात आणि ही शुद्ध खीर सेवन केल्याने आरोग्य चांगले राहते

शुद्ध

यादिवशी चंद्र देवता अमृत वर्षाव करत असून हा वर्षाव दुधात सामावला जातो आणि त्याचे सेवन केल्याने शुद्धता मिळते असाही समज आहे

अमृत

चंद्र कोजागिरी पौर्णिमेला पृथ्वीच्या अत्यंत जवळ असून सकारात्मक उर्जा मिळते आणि म्हणूनच मसालादूध या प्रकाशात ठेवले जाते

सकारात्मकता

धार्मिक मान्यतेनुसार चंद्राच्या प्रकाशातील या दुधाचे सेवन केल्याने अनेक आजार दूर राहतात

आजार

ही माहिती ज्योतिषशास्त्रानुसार असून आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप