यावेळी नवरात्रीची सुरुवात 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत असेल. यावेळी देवीच्या 9 दिवस 9 रुपांची पूजा केली जाते.
या दिवशी भाविक घरामध्ये कलश स्थापन करतात आणि 9 दिवस उपवास देखील करतात.
नवरात्रीमध्ये देवीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केले जातात. एक उपाय लवंग आणि वेलचीशी संबंधित आहे. लवंग वेलची अर्पण करण्याचे फायदे जाणून घ्या
नवरात्रीच्या दिवसात देवीची पूजा करताना छोटी वेलची अर्पण करणे फायदेशीर मानले जाते. देवीच्या पूजेनंतर वेलची अर्पण करावी.
लवंग आणि वेलचीला शुद्धता आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते.
देवीला याचा सुंगध फार आवडतो. हे अर्पण केल्याने देवी प्रसन्न होते आणि संपत्तीमध्ये वाढ होते, असे म्हटले जाते.
देवीला लवंग आणि वेलची अर्पण केल्यास पैशांची समस्या दूर होते आणि आर्थिक स्थिती सुधारते.
पूजेमध्ये लवंगाचा वापर आरोग्यासाठी फायदेशीर असतो आणि आजारांना दूर ठेवतो. हे वाईट नजरेपासून आणि वाईट शक्तींपासून देखील संरक्षण करते.
देवीच्या समोर दिवा लावा आणि त्यात दोन लवंगा टाका. हवन करताना त्यात लवंग टाका त्याचा तुम्हाला फायदा होईल.