शैलपुत्री, ब्रम्हचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धीदात्री ही रुपे आहेत
शैलपुत्री देवी हे देवीचे पहिले रुप आहे. देवीच्या एका हातामध्ये कमळ तर दुसऱ्या हातामध्ये त्रिशूळ आहे आणि ती नंदीवर स्वार असलेली आहे. शैल म्हणजे पर्वत त्यामुळे तिला शैलपुत्री या नावाने ओळखले जाते.
ब्रम्हचारिणी देवीची पूजा केली जाते. या देवीच्या एका हातामध्ये रुद्राक्ष माळ तर दुसऱ्या हातामध्ये कमडंलू घेऊन ती अडवाणी पायांनी चालते हे तिच्या रुपाचे प्रतीक मानले जाते
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. या देवीला रणचंडी या नावाने देखील ओळखले जाते. असे म्हटले जाते की, ती नेहमी राक्षसांशी लढण्यासाठी तयार असते.
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. या देवीला अष्टभुजा म्हणून ओळखले जाते. कुष्मांडा हे तीन शब्दांपासून बनलेले आहे.
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीची पूजा केली जाते. या देवीला चार हात, तीन डोळे आणि ती सिंहावर आरुढ आहे. या देवीला पंचमी असे देखील म्हटले जाते.
नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते. तिला एक शक्तीचे रुप मानले जाते.
नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते. या देवीला काली माता म्हणून ओळखले जाते. ही देवी सर्वांत हिंसक स्वरुपापैकी एक मानली जाते.
नवरात्रीच्या आठव्या दिवशी म्हणजे अष्टमीला महागौरीची पूजा केली जाते. देवीच्या दोन हातामध्ये डमरु आणि त्रिशूळ आहे तर दुसऱ्या हातामध्ये वरद आणि अभय मुद्रा आहे.
नवमीच्या दिवशी सिद्धीदात्री देवीची पूजा केली जाते. या देवीला सर्व सिद्धी देणारी म्हणून ओळखले जाते.