Published Sept 23, 2024
By Shubhangi Mere
Pic Credit - Social Media
वादग्रस्त रिॲलिटी शो 'बिग बॉस 13' मधून जगाला तुफान गाजवणारी शहनाज गिल तिच्या लूकमुळे चर्चेत असते.
शहनाजने इन्स्टावर तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत ज्यामुळे इंटरनेटचे तापमान वाढले आहे.
इंस्टाग्रामवर शेहनाजने फोटो शेअर केले आहेत यामध्ये आतापर्यंतचा सर्वात सुंदर लूक चाहत्यांना पाहायला मिळाला आहे.
लेटेस्ट फोटोशूटसाठी शहनाजने पांढऱ्या रंगाचा शॉर्ट्स ड्रेस परिधान केला आहे. ज्यासोबत तिने लाल रंगाचा लांब स्कार्फ घातला आहे.
उघडे ओले केस, चकचकीत मेकअप आणि गळ्यात मॅचिंग नेकलेस घालून शहनाजने तिचा सुंदर लुक पूर्ण केला आहे.
शहनाज चर्चेत आली जेव्हा तिने 'बिग बॉस ओटीटी सीझन 3' मध्ये बॉलिवूड अभिनेता रणवीर शौरीला कपडे पाठवले होते.
'बिग बॉस 13' पासून शहनाज गिल लोकांच्या मनात बसली, शोमध्ये सिद्धार्थ शुक्लासोबतची तिची बॉन्डिंग लोकांना खूप आवडली.
सिद्धार्थ शुक्ला आणि शेहनाज गिल यांची केमिस्ट्री आणि कडू-गोड वादामुळे 'बिग बॉस'चा तो सीझन सर्वात जास्त हिट ठरला.
२०२३ मध्ये प्रदर्शित झालेला सलमानचा सिनेमा किसी का भाई किसी की जान चित्रपटामधून शेहनाज गिलने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते.