Published March 13, 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - Google
मुघल, पोर्तुगीज आणि इंग्रज अशा कितीतरी परकीय सत्तांशी एक हाती मराठे लढले होते.
छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात युक्ती प्रमाणे शक्ती देखील होती.
धोप ही तलवारीचाच एक प्रकार आहे. शिवरायांचे हे प्रमुख हत्यार मानले जायचे.
धोप हे शस्त्र राजघरण्य़ाचे भूषण मानले जात असे.
दांडपट्टा हे शिवकालीन अत्यंत धारदार शस्त्र आहे. दांडपट्ट्याच्या विळख्यात सापडल्यावर शत्रूचा मृत्यू अटळ आहे.
पोलादी असलेला हा दांडपट्टा वजनाने हलका पण एकापेक्षा जास्त शत्रूंशी झुंजण्यासाठी याचा खुप चांगला वापर व्हायचा.
पावनखिंड लढताना बाजी प्रभू देशपांडे यांनी दांडपट्टा चालवल्याची शौर्यगाथा आजही अंगावर शहारे आणते.
पोलादी असलेला हा दांडपट्टा वजनाने हलका पण एकापेक्षा जास्त शत्रूंशी झुंजण्यासाठी याचा खुप चांगला वापर व्हायचा.
मराठ्यांच्या दरबारात कट्ट्यारीला विशेष मान होता.
मावळे कट्ट्यार कमरेच्या शेल्याला बांधत असे.
वाघाच्या पंज्यावरील नखांप्रमाणे असेली वाघनखं. धारदार शस्त्र असून मूठ वळल्यावर ती पंजात लपवता येतात.
अंगठया आतील बाजूने एका धातूपट्टीने जोडलेल्या असून त्यावर तीक्ष्ण नखे लावलेली असतात.
वाघनखांमुळे शत्रु बेसावध असताना हल्ला करता येतो.
मराठा सैन्यातील मावळे भालाफेकमध्ये तरबेज होते.
भाला बाणासारखे धारदार असते. हे शिवकालीन प्रमुख शस्त्र मानले जाते.