Published Feb 17, 2025
By Mayur Navle
Pic Credit - Pinterest
शिवजयंती येण्यास आता काहीच दिवसाचा अवधी उरला आहे. अशातच आज आपण महाराजांकडून काय शिकावे त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
महाराजांची स्वराज्याची छोटी सुरुवात केली आणि पुढे त्यास मोठे आपण केले. आपण सुद्धा आपल्या आयुष्यात छोटी सुरुवा करणे गरजेचे आहे.
ज्यावेळी भारतात कोणाचीच समुद्रावर सत्ता नव्हती त्याकाळात महाराजांनी स्वतःचे स्वतंत्र आरमार उभे केले. ही होती त्यांची दूरदृष्टी.
पुरंदरचा तह हा महाराज आणि स्वराज्यासाठी मोठा आघात होता. पण स्वतःवर विश्वास ठेवून महाराजांनी स्वराज्य अजून मोठे केले.
शाहिस्तखानावर स्वारी करताना टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचे होते, जे महाराजांनी तंतोतंत पाळले.
महाराजांनी जितक्या मोहिमा केल्या, त्यात टीम वर्क आपसूकच दिसून येते.
पन्हाळ्याच्या वेढ्यात महाराज सहा महिने अडकले होते. पण यावेळी त्यांनी शांततेत निर्णय घेऊन सिद्दीचा वेढा फोडला.