दही शरीरासाठी फायदेशीर असते आणि पचन सुधारते. हिवाळ्यामध्ये पण बरेच जण दही खातात. यावेळी काही लोकांनी दही खाऊ नये. दही खाण्याचे कोणी टाळावे ते जाणून घ्या
हिवाळ्यात दह्याचा थंडावा असतो. ज्यांना वारंवार सर्दी खोकलाच्या समस्या आहेत अशा लोकांनी दही खाऊ नये
ज्यांचे पचन कमकुवत आहे अशा लोकांना गॅस, अपचन आणि पोटाच्या समस्या जाणवू शकतात. कारण थंडीत पचनक्रिया मंदावते.
हिवाळ्यात सांधेदुखी किंवा सूज यांसारख्या समस्या असलेल्यांनी दह्याचे सेवन मर्यादित करावे.
हिवाळ्यात रात्रीच्या वेळी दही खाणे हानिकारक असू शकते. यामुळे कफ वाढतो आणि पोटाच्या समस्या जाणवतात. त्यामुळे रात्री दही खाण्याचे टाळावे
ज्यांना घसा खवखवणे किंवा बसणे याची समस्या आहे अशा लोकांनी दही खाणे हानिकारक आहे. यामुळे गळ्यामध्ये कफ तयार होऊ शकतो.
ॲलर्जी किंवा सायनस असलेल्या लोकांची दही खाल्ल्याने समस्या वाढू शकते. ज्यामुळे डोक दुखणे, नाक बंद, श्वासाची समस्या होऊ शकते