कांद्यामध्ये व्हिटॅमिन C, B6, पोटॅशियम, अँटीऑक्सिडंट्स असतात,जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि पेशींचे नुकसान होऊ देत नाहीत.
Picture Credit: Pinterest
कच्चा कांदा पचनसंस्थेसाठी उपयुक्त आहे. यात असलेले नैसर्गिक फायबर पचनाला मदत करतात आणि गॅसची समस्या कमी करतात.
Picture Credit: Pinterest
कच्चा कांदा रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतो. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
Picture Credit: Pinterest
उन्हाळ्यात कच्चा कांदा खाल्ल्याने शरीराचे तापमान संतुलित राहते. तो शरीराला नैसर्गिक थंडावा देतो.
Picture Credit: Pinterest
कांद्यामध्ये जंतुनाशक आणि विषाणूनाशक गुण असतात. त्यामुळे तो तोंडातील आणि पोटातील संसर्ग टाळतो.
Picture Credit: Pinterest
जरी कच्चा कांदा फायदेशीर असला तरी अतिप्रमाणात खाल्ल्यास पोटात जळजळ, वास येणे किंवा आम्लपित्त वाढू शकते.
Picture Credit: Pinterest
मर्यादित प्रमाणात कच्चा कांदा जेवणासोबत खाणे चांगले असते. पचनाच्या समस्या असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन खा.
Picture Credit: Pinterest