अँटीएजिंग इंजेक्शन जसे की बोटोक्स आणि डर्मल फिलर्स वय वाढण्याची लक्षणे कमी करण्यास मदत करतात, पण याचे दुष्परिणामही आहेत
इंजेक्शन घेतल्यानंतर त्याठिकाणी दुखणे, लालसरपणा, जखम होणे, सूज येणे असे परिणाम दिसून येऊ शकतात
काही जणांना यामुळे अॅलर्जी, खाज येणे, पुरळ येणे, श्वास घ्यायला त्रास होणे, चक्कर येणे असे त्रास होऊ शकतात, तसंच इन्फेक्शन होऊ शकते
मांसपेशींना आराम देण्यासाठी अँटीएजिंग इंजेक्शन प्रभावी ठरते, पण यानंतर चेहरा थोडा वेगळा दिसू लागतो
इंजेक्शन घेतल्यानंतर डोकेदुखी, थकवा आणि तापासारखी काही लक्षणं दिसतात आणि अंगही दुखते
अँटीएजिंग इंजेक्शनंतर तोंड सुकतं आणि सतत तहान लागते आणि यामुळे त्रास होऊ शकतो
इंजेक्शनचा परिणाम हा साधारण 3-6 महिन्यापर्यंतच राहतो, त्यानंतर पुन्हा इंजेक्शन घ्यावे लागते
अँटीएजिंग इंजेक्शनमुळे अनेकांना त्रास होत असल्याचे समोर आले आहे पण तरीही तुम्ही स्वतः ठरवावे
आपल्या कॉस्मेटॉलॉजिस्टचा सल्ला घेणे गरजेचे आहे, आम्ही कोणताही दावा करत नाही