Published Jan 22, 2025
By Mayur Navle
Pic Credit - iStock
असे क्वचितच लोकं असतील ज्यांना चॉकलेट खाणे आवडत नाही.
त्यातही लहान मुलांना चॉकलेट खाणे खूप आवडतं असते. पण त्यांना जास्त चॉकलेट देणे आरोग्याच्या दृष्टीने चुकीचे आहे.
चॉकलेटमध्ये जास्त प्रमाणात साखर असते, जी दातांवर चिकटून राहते आणि किडण्यास कारणीभूत ठरते.
चॉकलेटमुळे लहान मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढते, कारण त्यात उच्च कॅलरी असते.
चॉकलेट खाल्ल्याने मुलांची नैसर्गिक भूक कमी होते, ज्यामुळे त्यांना पोषक आहार मिळत नाही.
चॉकलेटमधील साखर मुलांना व्यसनाधीन बनवू शकते.
चॉकलेटमुळे शरीराला झटक्यात ऊर्जा मिळते, पण नंतर थकवा आणि चिडचिड होण्याची शक्यता असते.
चॉकलेट खाल्ल्याने मुलांना योग्य पोषणमूल्य मिळत नाही आणि त्यामुळे त्यांच्या शारीरिक विकासावर विपरित परिणाम होतो.