तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याचे दुष्परिणाम जाणून घ्या

Lifestyle

29 April 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

तांब्याच्या भांड्यातून पाणी

तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत त्यासोबतच दुष्परिणाम देखील आहेत. काय आहेत दुष्परिणाम जाणून घ्या

Picture Credit: Pinterest

तांब्याच्या भांड्यात किंवा बाटलीतून पाणी प्यायल्यास शरीरात तांब्याचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त होऊ शकते. यामुळे मळमळ, उलट्या, पोटदुखी, जुलाब आणि डोकेदुखी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

तांब्यातून विषबाधा

Picture Credit: Pinterest

जास्त प्रमाणात तांबे पोटात गेल्यामुळे पोटाच्या समस्या जसे की गॅस, जुलाब किंवा पोटात पेटके येणे, असे प्रकार घडू शकतात.

पचनसंस्थेवर परिणाम

Picture Credit: Pinterest

अति प्रमाणात तांब्याचे सेवन यकृत आणि मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

यकृत आणि किडनीचे नुकसान

Picture Credit: Pinterest

तांब्याच्या भांड्यात लिंबू पाणी, दूध, फळांचा रस किंवा गरम पाणी ठेवू नये. तांबे ॲसिडिक पदार्थांशी अभिक्रिया करते, ज्यामुळे विषारी पदार्थ तयार होऊ शकतात आणि उलट्या किंवा विषबाधा होऊ शकते.

ॲसिडिक पेये हानिकारक

Picture Credit: Pinterest

जर तांब्याचे भांडे आतून व्यवस्थित घासून स्वच्छ केले नाही, तर त्यावर कॉपर ऑक्साईडचा थर साचतो. हे पाणी पिण्यामुळे आरोग्यास हानी पोहोचू शकते. 

भांडे न घासल्यास धोका

Picture Credit: Pinterest

दिवसातून फक्त १-२ ग्लास तांब्याचे पाणी प्यावे, तेही सकाळी रिकाम्या पोटी. रात्री पाणी भरून सकाळी ते पिणे सुरक्षित मानले जाते, पण पाणी साठवण्याचा कालावधी खूप जास्त नसावा.

काय काळजी घ्यावी

Picture Credit: Pinterest