आपल्या शरीरासाठी पाणी पिणे हे किती महत्वाचे आहे, हे आपण जाणतोच.
आपल्यापैकी अनेक जण उभ्या-उभ्याच पाणी पित असतात. मात्र, यामुळे आपल्या आरोग्याचे नुकसान होऊ शकते.
उभं राहून पाणी प्यायल्यामुळे पाणी अचानक पोटात जाते आणि पचनक्रिया बाधित होते.
अशा प्रकारे पाणी प्यायल्यास किडनीला योग्य पद्धतीने फिल्ट्रेशन करता येत नाही.
उभं राहून पाणी प्यायल्यास गॅस, ॲसिडिटी व सूज होण्याचा धोका वाढतो.
चुकीच्या पद्धतीने पाणी पिण्याने सांधे आणि घोट्यांमध्ये वेदना निर्माण होऊ शकतात.
शरीरात अचानक पाण्याचा जोर येत असल्यामुळे हृदयावर अनावश्यक ताण निर्माण होतो.
उभं राहून पाणी प्यायल्यास श्वास घेण्याच्या प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो.