www.navarashtra.com

Published Dev 13,  2024

By  Dipali Naphade

रोज पाणीपुरी खाण्याचे नुकसान

Pic Credit -   iStock

अत्यंत प्रसिद्ध असणारे स्ट्रीट फूड म्हणजे पाणीपुरी, मसालेदार पाणीपुरीचं नाव घेतलं तरीही तोंडाला पाणी सुटतं

पाणीपुरी

अनेक जण आठवड्यातून किमान 2-3 वेळा पाणीपुरी खातात, मात्र हे शरीरासाठी नक्कीच नुकसानदायी ठरू शकतं

हानिकारक

पाणीपुरीत अधिक प्रमाणात मीठ असते, ज्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होऊ शकते आणि हृदयावर दबाव पडतो

ब्लड प्रेशर

पाणीपुरीत असणारे मसाले आणि चटण्यांमुळे पोटात जळजळ, गॅस, अपचन आणि अ‍ॅसिडिटी होते

अ‍ॅसिडिटी

पाणीपुरीचे सेवन अल्सरच्या रूग्णांसाठी त्रासदायक ठरू शकते. यात मसाले, चटणी आणि कधीकधी घाणेरड्या पाण्याचा समावेश असतो

अल्सर

पाणीपुरीमध्ये अधिक कॅलरीज असून रोज याचे  सेवन केल्याने लठ्ठपणासाठी कारणीभूत ठरू शकते

लठ्ठपणा

.

ज्या व्यक्ती पाणीपुरीचे अतिसेवन करतात त्यांना डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते ज्यामुळे डोकंदुखी होते

डिहायड्रेशन

.

चटणी आणि पाण्यातील साखरेमुळे पाणीपुरी ही डायबिटीसच्या रुग्णांसाठी त्रासदायक ठरू शकते

डायबिटीस

.

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

.

6 कारणांनी होते आतड्यांशी संबंधित समस्या