आतड्यांच्या आजाराची 6 कारणे
गट हेल्थ
गट हेल्थ चांगली राखणं अत्यंत गरजेचे आहे. यासंबंधित समस्या सुरू झाल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करू नये. काय आहेत कारणं?
तज्ज्ञांचे म्हणणे
डाएटिशियन मनप्रीत कारलाच्या म्हणण्यानुसार, अनेक लोकांना ब्लोटिंग, बद्धकोष्ठता, डोकेदुखीसारख्या समस्या गट हेल्थमुळे होतात
प्रोसेस्ड शुगर
प्रोसेस्ड शुगर अधिक खाल्ल्याने आतड्यात बॅड बॅक्टेरिया वाढतात आणि गुड बॅक्टेरिया कमी होतात, आरोग्यासाठी नुकसानदायी आहे
फॅट्सयुक्त खाणे
प्रोसेस्ड फॅट आरोग्यासाठी नुकसानदायी आहे याचे अधिक सेवन करू नका. त्यामुळे वाईट बॅक्टेरिया वाढून सूज येते
क्रोनिक स्ट्रेस
अनेक जणांना क्रोनिक स्ट्रेस असल्याने मेंदू आणि आतड्यांशी संबंधित समस्या होऊन शरीराचे नुकसान होते
अँटीबायोटिक्स
काही लोक नियमित स्वरूपात अँटीबायोटिक्सचे सेवन करत असल्यामुळे चांगले बॅक्टेरिया शरीरातून कमी होतात आणि आतडे खराब होते
.
शारीरिक हालचाल
सतत बसून वा झोपून राहिल्याने आणि शारीरिक हालचाल न केल्याने अनेकांना गट हेल्थ आणि पचनासंबंधित समस्या होतात
.
अनिद्रा
याशिवाय अनिद्रेची समस्या वा योग्य झोप न घेतल्यानेही आतड्यांवर परिणाम होतो आणि ब्लोटिंग होऊ शकते
.
टीप
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही
.

