Published Sept 27, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
सकाळी उपाशीपोटी दूध-केळं खाल्ल्याने काय होते?
दूध आणि केळ्यात फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, प्रोटीन असे अनेक पोषक तत्व आढळतात
डाएट मंत्राची फाऊंडर आणि डाएटिशियन कामिनी सिन्हाने सांगितले की तुम्ही रोज 2-3 केळी आणि दूध पिऊ शकता
केळं आणि दुधाच्या एकत्रित सेवनाने पचनासंबंधित त्रास कमी होतात. बद्धकोष्ठता, अपचनापासून सुटका मिळते
.
सकाळी उपाशीपोटी केळं दूध एकत्र खाल्ल्याने दिवसभर शरीराला एनर्जी मिळते आणि अधिक काळ पोट भरलेले राहते
.
केळ्यातील मॅग्नेशियम आणि पोटॅशियममुळे तणावाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळते
केळं आणि दुधाच्या सेवनाने ब्लड प्रेशर नियंत्रणात आणण्यास मदत मिळते
दूध आणि केळ्यात अधिक कॅलरी असते, वजन वाढविण्यासाठी सकाळी उपाशीपोटी सेवन करणे हा उत्तम पर्याय आहे
केळं आणि दुधातील प्रोटीन आणि कॅल्शियममुळे हाडांना आणि मांसपेशींना अधिक मजबूती मिळते
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही