www.navarashtra.com

Published Dec 30,  2024

By  Mayur Navle 

सतत स्क्रबिंग करणे सुद्धा बरे नाही, चेहरा होईल अधिकच कुरूप 

Pic Credit -   iStock

हल्ली अनेक जण चेहऱ्यावरील टॅनिंग कमी करण्यासाठी स्क्रबिंग करतात.

स्क्रबिंग

परंतु अनेक जण स्क्रबिंग आठवड्यातून अनेकदा करताना दिसतात. यामुळे नुकसान होऊ शकते. चला याबद्दल जाणून घेऊया. 

नुकसान देखील होऊ शकते

वारंवार स्क्रबिंग केल्याने त्वचेची नैसर्गिक संरक्षक थर नष्ट होतो, ज्यामुळे त्वचा कोरडी आणि संवेदनशील होते.

त्वचेचे नुकसान

सतत घर्षणामुळे त्वचेवर लालसरपणा, खाज आणि जळजळ होऊ शकते.

लालसरपणा व जळजळ

स्क्रबिंगमुळे त्वचेतील नैसर्गिक ऑईल कमी होतात, ज्यामुळे त्वचा निर्जीव दिसू शकते.

ओलावा कमी होणे

त्वचा सतत स्क्रब केल्याने ती अधिक संवेदनशील होते आणि त्यामुळे पुरळ व मुरुमांचा त्रास वाढतो.

पुरळ होण्याची शक्यता

अति स्क्रबिंग केल्यामुळे त्वचेला सूज येते किंवा जखमा होण्याची शक्यता वाढते.

डाग आणि जखमा

स्क्रबिंगमुळे त्वचेवर हायपरपिग्मेंटेशन म्हणजेच काळे डाग तयार होऊ शकतात.

हायपरपिग्मेंटेशन

.

अशाप्रकारे अक्रोड खाल्ल्यास या 5 समस्या होतील छुमंतर