Published Feb 06, 2025
By Mayur Navle
Pic Credit - iStock
लाल मिरचीचा वापर मुख्यतः मसाले वापरण्यासाठी केला जातो.
लाल मिरचीचे सेवन आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकते.
एक्सपर्टस म्हणतात की लाल मिरचीचे सेवन शरीरासाठी फायदेशीर नसते. याचे जास्त सेवन पोटातील जळजळीचे कारण बनू शकते.
लाल मिरचीचे जास्त सेवन पचन समस्यांना आमंत्रित करू शकते. ज्यामुळे, छातीत जळजळ निर्माण होऊ शकते.
काही लोकांना लाल मिरचीपासून ॲलर्जी असू शकते, ज्यामुळे त्वचेवर त्याचा परिणाम दिसू शकतो.
जास्त लाल मिरची खाल्ल्याने तोंडात जळजळ होऊ शकते. म्हणूनच लाल मिरची जितकी कमी खाता येईल तेवढे चांगले.
ज्यांना हृदयासंबंधित काही समस्या असेल त्यांनी लाल मिरची खाणे टाळले पाहिजे.