Written By: Trupti Gaikwad
Source: Yandex
सत्य नारायणाच्या पूजेला हिंदू धर्मात मोठं महत्त्व प्राप्त आहे.
या पुजेला तुळशीपत्राचं नेमकं महत्त्व काय याबाबत किस्सों की दुनिया या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन माहिती देण्यात आली आहे.
सत्य नारायण हे भगवान विष्णूंचे रुप आहे.
भगवान विष्णू हे सत्य आणि स्थिरतेचं प्रतीक मानलं जातं.
विष्णूदेव सृष्टीचे पालनहार आहेत ते न्याय आणि सत्याचं प्रतिनिधित्व करतात.
असं म्हणतात की माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना तुळस प्रचंड प्रिय आहे.
तुळशीपत्रात माता लक्ष्मीचा वास असतो असं म्हणतात.
याच कारणामुळे तुळशीच्या पानाने अभिषेक केला जातो. असं केल्याने माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.