पोटात आणि कंबरेत नियमित अंतराने वेदना जाणवू लागतात. या वेदना हळूहळू वाढत जातात आणि त्या कमी-जास्त होत नाहीत.
Picture Credit: Pinterest
प्रसूती जवळ येत असताना गर्भाशयाचं तोंड पातळ आणि मऊ होतं. यामुळे ते उघडण्यासाठी तयार होतं.
Picture Credit: Pinterest
डॉक्टर सांगतात की सर्विक्स किती सें.मी. उघडलं आहे. १–१० सें.मी. पर्यंत उघडतं. १० सें.मी. म्हणजे बाळ जन्मासाठी पूर्णपणे तयार.
Picture Credit: Pinterest
योनीतून पांढरा-सायदार म्युकस प्लग थोड्या रक्तासह बाहेर पडू शकतो. हे प्रसवाची प्रक्रिया सुरू झाल्याचं संकेत.
Picture Credit: Pinterest
योनीतून पाण्यासारखा द्रव वाहू लागतो. हे अम्नियॉटिक फ्लुइड असून पिशवी फुटल्याचा स्पष्ट संकेत असतो.
Picture Credit: Pinterest
बाळ खाली सरकू लागल्याने योनीजवळ आणि पोटाच्या खालच्या भागात दडपण जाणवतं. चालताना जडपणही जाणवू शकतं.
Picture Credit: Pinterest
पाठदुखी, पायात वेदना, वारंवार लघवीची इच्छा, शरीरात अस्वस्थता हे सर्व सर्विक्स बदलू लागल्याची लक्षणे असू शकतात.
Picture Credit: Pinterest