Published Nov 23, 2024
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
लठ्ठपणा ही जगातील एक मोठी समस्या बनली आहे. अनेक लोक या समस्येचा सामना करत आहेत.
परंतु तुम्हाला अशा देशाबद्दल माहिती आहे का जिथे जगातील सर्वात फिट लोक राहतात?
या देशात एखाद्या व्यक्तिच्या कंबरेचा आकार वाढला तर त्याच्यासाठी विशेष कायदा आहे.
सिंगापूरमध्ये सर्वात जास्त फिट लोक राहतात. कारण सिंगापूरमध्ये लठ्ठ लोकांसाठी कायदा आहे.
सिंगापूरमध्ये लोकांच्या फिटनेससाठी कायदा लागू करण्यात आला आहे. 40 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोकांसाठी हा कायदा आहे.
सिंगापूरमध्ये मेटाबो लॉ म्हणून ओळखला जाणारा एक आरोग्य उपक्रम आहे.
हा कायदा जपानच्या मेटाबो कायद्यापासून प्रेरित आहे आणि देशातील लठ्ठपणाच्या समस्येला तोंड देणे हा त्याचा उद्देश आहे.
हा कायदा 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लागू होतो. यामध्ये या लोकांच्या कंबरेचे माप नियमितपणे घेतले जाते.
जर एखाद्याच्या कंबरेचा आकार निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असेल तर त्याला आरोग्य तपासणी करावी लागेल.
तसेच आवश्यकतेपेक्षा जास्त वजन असेल तर वजन कमी करण्यासाठी योग्य पावले उचलावी लागतात.
मेटाबो कायद्याचा उद्देश लोकांना निरोगी राहण्यासाठी प्रेरित करणे हा आहे.
हा कायदा लोकांना त्यांच्या आरोग्याविषयी जागरूक आणि लठ्ठपणाशी संबंधित आरोग्य धोक्यांबद्दल सांगतो.
सिंगापूरमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण इतर विकसित देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे.