Published Dec 23, 2024
By Prajakta Pradhan
Pic Credit - istock
सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात. यावेळी पौष महिन्याची अमावस्या तिथी 30 डिसेंबर रोजी आहे या दिवशी सोमवार आहे.
सोमवती अमावस्येचे हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. या विशेष तिथीला पवित्र नदीत स्नान करणे आणि दान करणे देखील खूप शुभ मानले जाते.
.
ज्यांचे दान सोमवती अमावस्येच्या दिवशी करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्या गोष्टी जाणून घेऊया
काळ्या तिळांचा संबंध पितरांशी असतो. याशिवाय काळे तीळाचा संबंध शनिदेवाशी सुद्धा मानला जातो
सोमवती अमावस्येच्या दिवशी काळे तीळ दान केल्याने पितरांची प्रसन्नता तर होतेच शिवाय शनिदेवाची कृपाही होते.
सोमवती अमावस्येच्या दिवशी चप्पलांचे दान करण्याचे खूप महत्त्व आहे. असे मानले जाते की, या दिवशी चप्पल बूटांचे दान केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते.
घरातील सदस्यांमध्ये मतभेद असल्यास सोमवती अमावस्येच्या दिवशी गुळाचे दान करावे.
असे मानले जाते की, सोमवती अमावस्येला गुळाचे दान केल्याने कौटुंबिक नात्यात मधुरता वाढते
सोमवती असमावस्येला काळ्या कपड्याचे दान करणे शुभ मानले जाते. असे केल्याने राहूची स्थिती अधिक मजबूत होते.