Published Jan 23, 2025
By Divesh Chavan
Pic Credit - pinterest
येत्या 1 फेब्रुवारी 2025 ला बजेट भारताचा बजेट सादर होणार आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण आहे बजेट सादर करतील.
यावेळी बजेटमध्ये आरोग्यासारख्या प्रमुख क्षेत्रांसाठीची तरतूद सुमारे १० टक्क्यांनी वाढवता येईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
या क्षेत्राशी संबंधित तज्ञ आरोग्य सेवांवरील जीएसटी शून्य करण्याचा किंवा तो ५ टक्के स्लॅबमध्ये आणण्याचा सल्ला देत आहेत.
नवीन प्रकल्पांसाठी किमान १५ वर्षांसाठी कर सवलत देणे, तसेच विद्यमान सुविधांसाठी १० वर्षांची कर सवलत देणे या प्रमुख मागण्या आहेत.
वैद्यकीय उपकरणांसाठी व्याजदरात सवलतींसह, या सुधारणा भारताच्या आरोग्यसेवेतील आधुनिकीकरणासाठी आर्थिक वाढ प्रदान करू शकतात.
आरोग्यसेवेची उपलब्धता सुधारण्याच्या उद्देशाने आयुष्मान भारत- PMJAY योजनेमुळे लहान शहरांमध्ये मागणी वाढली आहे.
तज्ज्ञांच्या मते, सरकारने Public Health Facilities चे बजेट वाढवावे आणि खाजगी क्षेत्राला मदत करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे.