मिसळ पाव हा महाराष्ट्रातील एक फेमस नाश्त्याला प्रकार आहे. जाणून घेऊया रेसिपी
Picture Credit: iStock
मोठ्या भांड्यात मटकी मोडून घेतलेली शिजवून घ्या. हळद आणि मीठ घालून १-२ शिट्ट्या घ्या.
तेल गरम करून त्यात कांदा, आलं-लसूण पेस्ट घालून परतून घ्या. कांदा लालसर झाल्यावर टोमॅटो टाका.
टोमॅटो मऊ झाल्यावर त्यात हळद, तिखट, गोडा मसाला आणि मीठ घालून चांगले परतून घ्या.
कढईत तेल गरम करून त्यात कांदा, लसूण, खोबरं खरपूस भाजून घ्या
थंड झाल्यावर गोडा मसाला व कोथिंबीर घालून वाटून घ्या. पाणी टाकून कट तयार करा आणि उकळा.
एक प्लेटमध्ये उसळ टाका, त्यावर कट घाला. वरून फरसाण, चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि लिंबू घाला.
गरम पाव तव्यावर गरम करून मिसळ बरोबर सर्व्ह करा.