Published August 18, 2024
By Shubhangi Mere
Pic Credit - Youtube Stree 2 Trailer
स्त्री २ या चित्रपटाची दिड लाखाहून अधिक तिकिटे ॲडव्हान्समध्ये प्रेक्षकांनी बुक केली होती.
स्त्री २ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी ७६.५ कोटींचा गल्ला जमवला होता.
.
चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत असलेले श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या अभिनयाची देशामध्ये वाहवाह केली जात आहे.
श्रद्धा आणि राजकुमारच्या या चित्रपटाने २ दिवसात १०० कोटींचा गल्ला जमवला आहे.
स्त्री २ सिनेमाने पहिल्याच दिवशी ७६.५ कोटींची कमाई करून पठाण चित्रपटाचा विक्रम मोडला. पठाणने पहिल्या दिवशी ६०.३ कोटी रुपयांची कमाई केली होती.
स्त्री २ या चित्रपटाला IMDp वरून ८.२/१० अशी रेटिंग देण्यात आली आहे, तर बुक माय शोवरून ९.१/१० अशी रेटिंग दिली आहे.
सिनेमा गृहांमध्ये कमाल करणाऱ्या स्त्री २ या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ११८ कोटींची कमाई केली होती.
स्त्री २ हा चित्रपट लवकर २०० कोटींचा गल्ला जमवेल, या चित्रपटाने तिसऱ्याच दिवशी १७२ कोटींची कमाई केली आहे.