भरलेल्या बोंबील फ्रायची रेसिपी एकदा करून तर पाहा

Life style

22 August, 2025

Author:  नुपूर भगत

बॉम्बील मासे स्वच्छ करून त्यांच्या पोटाकडून चिरा मारून हाडं अलगद काढा. माशांचे पोट आतून स्वच्छ धुऊन बाजूला ठेवा.

मासे धुवा

Picture Credit: Pinterest

कढईत थोडं तेल गरम करून त्यात कांदा, हिरवी मिरची, खोबरा, तिखट, धणेपूड, जिरेपूड, गरम मसाला घालून परतून घ्या.

मसाला बनवा

Picture Credit: Pinterest

तयार मसाला गॅसवरून उतरवा. त्यात कोथिंबीर व लिंबूरस घालून मिक्स करा. हा स्टफिंगसाठीचा मसाला तयार आहे.

लिंबू आणि कोथिंबीर

Picture Credit: Pinterest

स्वच्छ केलेल्या बॉम्बीलमध्ये हा मसाला भरून घ्या. हाताने हलकेच दाबून मसाला आत बसवा.

मसाला भरा

Picture Credit: Pinterest

भरलेले बॉम्बील हलक्या हाताने तांदळाच्या पिठात किंवा रव्यात घोळवा. यामुळे फ्राय करताना कुरकुरीत पोत येतो.

कोटिंग करा

Picture Credit: Pinterest

कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर भरलेले बॉम्बील दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.

तळून घ्या

Picture Credit: Pinterest

गरमागरम स्टफ्ड बॉम्बील फ्राय कांदा-लिंबाच्या फोडींसोबत व भातावर वाढा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest