सुब्रमण्यम षष्ठीला शिवलिंगावर काय अर्पण करावे जाणून घ्या 

Life style

22 November, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

हिंदू धर्मामध्ये सुब्रमण्यम षष्ठी खूप शुभ मानली जाते. हा दिवस महादेव आणि पार्वती यांचा मुलगा कार्तिकेय यांना समर्पित आहे. यामुळे भक्ताच्या मनातील इच्छा हळूहळू पूर्ण होतात.

सुब्रमण्यम षष्ठी

सुब्रमण्यम षष्ठीच्या दिवशी शिवलिंगावर काही गोष्टी अर्पण केल्यास तुमच्या जीवनात आनंद येईल. शिवलिंगावर काय अर्पण करावे जाणून घ्या 

या गोष्टी अर्पण करा

दूध अर्पण करा

जर तुम्ही सुब्रमण्यम षष्ठीच्या दिवशी शिवलिंगावर दूध अर्पण केल्यास तुमच्या जीवनात आनंद येईल आणि संकट दूर होतील.

दही अर्पण करा 

जर तुम्ही सुब्रमण्यम षष्ठीच्या दिवशी शिवलिंगावर दही अर्पण केल्यास घरामध्ये धनाचे आगमन होते. 

बेलपत्र अर्पण करा

हिंदू धर्मामध्ये बेलपत्राला खूप महत्त्व आहे. हे महादेवांना खूप प्रिय आहे. सुब्रमण्यम षष्ठी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करावे. त्यामुळे तुम्हाला नशिबाची साथ मिळेल.

उसाचा रस

सुब्रमण्यम साष्टीच्या दिवशी शिवलिंगावर उसाच्या रसाने अभिषेक केल्याने दीर्घकाळापासून रखडलेल्या कामामध्ये अपेक्षित यश मिळेल. याशिवाय कर्जाच्या समस्येतून देखील सुटका होईल.

काळे तीळ अर्पण करा

सुब्रमण्यम षष्ठीच्या दिवशी शिवलिंगावर काळे तीळ अर्पण केल्याने प्रगती होते. तुमच्या मान सन्मानात वाढ होईल.