Published Nov 29, 2024
By Trupti Gaikwad
Pic Credit - Social Media
कोरड्या त्वचेवर बडिशेपचा रामबाण उपाय, कसा ते जाणून घ्या
वातावरणातील वाढत्या थंडीमुळे त्वचेच्या आरोग्यावर गंभीर परिणाम दिसू लागतात.
शरीरात पुरेसं पाणी जात नसल्याने त्वचा कोरडी पडायला सुरुवात होते.
थंडीत त्वचा कोरडी पडू नये यासाठी तुम्ही बडिशेपचा उपाय देखील करु शकता.
.
बडिशेपमध्ये पोटॅशियम, सेलेनियम आणि जस्त घटक आढळतात.
.
बडिशेपमधील आढळणारे जीवनसत्त्वं त्वचेसाठी गुणकारी ठरतात.
थंडीमध्ये सतत त्वचा कोरडी पडत असेल तर बडिशेपच्या पाण्याने चेहऱ्यावर मसाज करा.
रात्रभर बडिशेप भिजवत ठेवा, सकाळी य़ा पाण्याने हलकसा मसाज करा,यामुळे चेहऱ्यावरील मृत पेशी निघून जातात.
त्वचेवर मुरुम, पुरळ आणि कोरडेपणा जाणवत असेल तर रोज सकाळी बडिशेपच्या पाण्याचे सेवन करा.
बडीशेपचं सेवन केल्याने रक्तातील ऑक्सिजन पातळी वाढते, त्यामुळे त्वचेच्या समस्या होत नाही.