Written By: Trupti Gaikwad
Source: Yandex
रोजच्या आयुष्यात मानसिक ताण तणावाने अनेक जण ग्रासलेले असतात.
या मानसिक नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी अध्यात्माची मोठी मदत होते.
अनेक जण असे आहेत जे स्वामी समर्थांना खूप मानतात आणि त्यांच्यावर विश्वास ठेवतात.
निराशेतून आशेची वाट दाखवणारे स्वामी समर्थांचे विचार जाणून घेऊयात.
संकटं आल्यावर पळवाटा शोधायच्या नाही तर त्यांना सामोरं जायचं असतं.
देवाला सांगू नका संकटं किती मोठी आहे, संकटांना सांगा तुमचा देव किती मोठा आहे.
विश्वास भक्कम असला की शेवटच्या क्षणी देखील चमत्कार घडतात.
तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी, तुला हरू देणार नाही, असं स्वामी त्यांच्या भक्तांना सांगतात.
मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही.