www.navarashtra.com

Published  Dec  2, 2024

By Shubhangi Mere

Pic Credit - Social Media

आयपीएल २०२५ चा लिलाव मनोरंजक ठरला आणि अनेक मोठ्या खेळाडूंवर करोडोंची बोली लागली आहे, संघाचे कर्णधार कोण असणार यावर एकदा नजर टाका.

संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स संघ 2022 मध्ये उपविजेता ठरला होता, सध्या तो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे पुढील हंगामात तो कर्णधार असेल.

संजू सॅमसन

गुजरात टायटन्सला हार्दिकने सोडल्यानंतर कर्णधारपद शुभमन गिल सांभाळत आहे, आयपीएल २०२५ देखील गुजरातची कमान त्याच्याकडेच असेल.

शुभमन गिल

आयपीएल २०२४ मध्ये हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद दिले होते, २०२५ आयपीएलमध्ये देखील तो कॅप्टन्सी सांभाळेल.

हार्दिक पांड्या

.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने विराट कोहलीला रिटेन केले आहे त्यामुळे आयपीएल २०२५ मध्ये कोहली पुन्हा संघाची कमान सांभाळताना दिसू शकतो.

विराट कोहली

.

दिल्ली कॅपिटल्सने रिषभ पंतला रिलीज केले, लिलावात २७ कोटींना LSG ने विकत घेतले आयपीएल २०२५ मध्ये पंत LSG चे कर्णधारपद सांभाळेल.

रिषभ पंत

दिल्ली कॅपिटल्सने पंतला सोडल्यानंतर केएल राहुलला संघामध्ये घेतले आहे, त्यामुळे आयपीएल २०२५ मध्ये राहुल दिल्ली ची कमान सांभाळेल.

केएल राहुल

कोलकाता नाईट रायडर्सने श्रेयस अय्यरला सोडल्यानंतर आता वेंकटेश अय्यरवर पैशांचा पाऊस केला आणि त्याला पुन्हा संघामध्ये घेतले आहे.

वेंकटेश अय्यर

CSK ने मागील वर्षी ऋतुराज गायकवाडला कर्णधारपद दिले आहे, आयपीएल २०२५ मध्ये देखील तोच चेन्नईचे कर्णधारपद सांभाळेल.

ऋतुराज गायकवाड

पंजाब किंग्सने KKR चा कर्णधार श्रेयस अय्यरला मोठ्या किमतीत विकत घेतले आहे, त्यामुळे अय्यरकडेच आयपीएल २०२५ मध्ये पंजाबचे कर्णधारपद असेल.

श्रेयस अय्यर

सनराइझर्स हैदराबादचे कर्णधारपद ईशान किशनकडे दिले जाऊ शकते, SRH चे कर्णधारपद कोणाकडे असणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.

ईशान किशन