Published OCT, 03, 2024
By Shubhangi Mere
Pic Credit -I Social Media
भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आयसीसी क्रमवारीमध्ये अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे, त्याच्या आकडेवारीवर एकदा नजर टाका.
कसोटी मालिकेत बांगलादेशचा क्लीन स्वीप केल्यानंतर आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीय खेळाडूंनी खळबळ उडवून दिली.
भारतीय संघासाठी T२० फॉरमॅटमध्ये जसप्रीत बुमराहने २०१६ मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात पदार्पण केले होते.
बुमराहने ७० सामन्यांमध्ये त्याने ८९ विकेट्स घेतले आहेत, सध्या तो भारतीय संघाचा मुख्य गोलंदाज आहे.
२०१८ मध्ये झालेल्या भारत विरुद्ध कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहने भारतासाठी संघामध्ये पदार्पण केले होते.
जसप्रीत बुमराहने कसोटी क्रिकेटमध्ये ७३ इनिंगमध्ये १७० विकेट्स नावावर केले आहेत.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये झालेल्या २०१६ मधील सामान्यत बुमराहला एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली होती.
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ८९ सामन्यांमध्ये १४९ विकेट्स घेतले आहेत.
आयपीएलचे बुमराहने आतापर्यत १३३ सामने खेळले आहेत, यामध्ये त्याने १६५ विकेट्स नावावर केले आहेत.