Written By: Divesh Chavan
Source: Pinterest
स्वच्छ वाळूचा समुद्रकिनारा आणि प्रसिद्ध गणपती मंदिरासाठी गणपतीपुळे हे एक आदर्श ठिकाण आहे. उन्हाळ्यात येथे गारवा अनुभवता येतो.
मुंबईच्या जवळ असलेले अलिबाग हे समुद्रकिनारे आणि किल्ले यांसाठी प्रसिद्ध आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी उत्तम पर्याय.
देवगडचा हापूस आंबा आणि शांत समुद्रकिनारा पर्यटकांना खुणावतो. उन्हाळ्यात आंब्याचा स्वादही चाखता येतो.
समुद्रात वसलेला ऐतिहासिक जलदुर्ग पाहण्यासाठी मुरुड जंजिरा एक उत्तम ठिकाण आहे. इतिहासप्रेमींसाठी खास.
शांतता अनुभवायला आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहायला श्रीवर्धन व हरिहरेश्वर ही सुंदर ठिकाणं आहेत.
आंबा, इतिहास, समुद्रकिनारे आणि संग्रहालये यांचं मिश्रण असलेलं रत्नागिरी उन्हाळी सहलीसाठी उत्तम आहे.
"मिनी महाबळेश्वर" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोलीत थोडा गारवा, समुद्रकिनारे आणि हिलस्टेशनचा अनुभव मिळतो.