अशा प्रकारे EV वाहनांची घ्या काळजी

Lifestyle

27 JULY, 2025

Author:  दिवेश चव्हाण

पावसात पाणी बॅटरीच्या संपर्कात आल्यास शॉर्टसर्किटचा धोका असतो. त्यामुळे EV पार्क करताना नेहमी आच्छादन (cover) वापरावं व शक्यतो बंद जागेत वाहन ठेवा.

बॅटरीचे संरक्षण

Picture Credit: Pinterest

पावसात चार्जिंग पोर्ट ओलसर झाल्यास चार्जिंगमध्ये अडथळा येतो. म्हणून प्रत्येक वापरानंतर चार्जिंग पोर्ट नीट बंद करा आणि त्यावर जलरोधक कव्हर वापरा.

कव्हर

Picture Credit: Pinterest

ओल्या रस्त्यांवर गाडी घसरण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे टायर्सची पकड (grip) चांगली असेल याची खात्री करा.

टायर्स

Picture Credit: Pinterest

पावसात ब्रेक्सवर पाणी किंवा चिखल साचल्यास ते नीट काम करत नाहीत. नियमितपणे ब्रेक्स तपासणी करून स्वच्छ करा.

ब्रेकिंग सिस्टीम

Picture Credit: Pinterest

EV मधील वायरिंग व इलेक्ट्रॉनिक कनेक्शनमध्ये गळती होऊ नये म्हणून वेळोवेळी तपासणी व मेंटेनन्स करा.

वायरिंग

Picture Credit: Pinterest

पावसाळ्यात गाडीला माती व चिखल लागतो. त्यामुळे नियमित धुणं गरजेचं आहे. अँटी-रस्ट किंवा सिरेमिक कोटिंग वापरल्यास गाडी टिकवण्यास मदत होते.

कोटिंग

Picture Credit: Pinterest